फरांदवाडी ट्रान्सफॉर्मरमधून ४५ हजार रुपयांची तांब्याची तार व ऑइलची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ : फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील कॅनॉल डीपी ट्रान्सफॉर्मरमधून १०० किलो तांब्याची तार व १०० लिटर ऑइल असा एकुण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने चोरुन नेला व ऑइल सांडून नुकसान केले आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, दिनांक २६/४/२०२३ रोजी रात्री ९.३० वाजता ते दिनांक २७/४/२०२३ रोजीचे सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील कॅनॉल डीपी नंबर ४११४२५२ या ट्रान्सफॉर्मरमधून १०० किलो तांब्याची तार व १०० लिटर ऑइल असा एकुण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने चोरुन नेला व ऑइल सांडून नुकसान केले असल्याची फिर्याद विजय शिवाजी मदने रा. नऊ सर्कल, साखरवाडी यांनी दिली आहे. आदित्य तपास पोलीस हवालदार गार्डी हे करीत आहेत.
No comments