Breaking News

एप्रिल महिन्यात तालुक्यांच्या ठिकाणी होणारा आरटीओ दौरा

Tour to Taluka locations in Mahe April through Sub-Regional Transport Office

  सातारा दि . 3 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा मार्फत खाजगी नवीन वाहन नोंदणी व तत्सम कामकाज तसेच पक्की अनुज्ञप्ती व तत्सम कामकाज करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा सातारा जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी माहे एप्रिल 2023 मध्ये खाली नमुद केलेल्या दिनांकास दौरा आयोजित केला आहे.

               महाबळेश्वर  दि. 3 एप्रिल2023, फलटण दि. 6, 13, 20 व 27 एप्रिल, वाई दि. 5 व 19 एप्रिल, वडूज दि. 11 व 21 एप्रिल, दहिवडी दि. 17 व 28 एप्रिल, खंडाळा दि. 12 व 26 एप्रिल,  लोणंद दि. 24 एप्रिल कोरेगाव  दि.  10 एप्रिल, व  शिरवळ  दि.  18 एप्रिल 2023  रोजी.

                तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, सातारा यांच्या आदेशान्वये वरील दौऱ्याच्या कामकाजामध्ये बदल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments