Breaking News

लूटमार ; पोलीस असल्याची बतावणी करून अडीच तोळे सोन्याची चैन लंपास

Two and a half tola gold chain stolen by fraud

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि.२९ : फलटण शहरातील सिटी बाजार ते डीएड कॉलेज चौक  या दरम्यान तिनजनांनी पोलीस असल्याचा बहाना करून, एकाची फसवणूक करून त्याच्या गळ्यातील १ लाख १२ हजार रुपये किंमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली आहे. 

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहितीनुसार, दि.  १८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  फलटण शहरातील सिटी बाजार ते डीएड कॉलेज चौक  रोडवर दत्तराज फडतरे हे मोटारसायकल वरून चालले असता, तीन इसमांनी त्यांची गाडी थांबवून, पोलीस असल्याचे बतावणी करून, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून रुमालात बांधण्यास सांगून, हात चालाकीने अडीच तोळे वजनाची व १ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीची सोन्याची चैन फसवणूक करून घेऊन निघून गेले असल्याची फिर्याद दि.  २७ एप्रिल २०२३ रोजी दत्तराज फडतरे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

No comments