श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवा निमित्त ९ मे रोजी अभिष्टचिंतन सोहळा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ मे : विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. ९ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुधोजी क्लब मैदान येथे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांची विशेष उपस्थिती असून, अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आहेत. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
श्रीमंत रामराजेंच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि.०१ मे २०२३ रोजी श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, फलटण येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, दि. ०२ मे २०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. मुधोजी क्लब, फलटण येथे फलटण मॅरेथॉन २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि.०३ मे ते ०७ में २०२३ दरम्यान छ. संभाजीराजे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि.०५ मे २०२३ रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शनिवार, दि. ०६ मे २०२३ रोजी साईमंदिरासमोर, जाधववाडी, फलटण येथे बैलगाडा शर्यत आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. ०७ मे २०२३ रोजी मुधोजी क्लब मैदान, माळजाई मंदिर, फलटण येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवार, दि.०८ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वा. विडणी, ता. फलटण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार, दि.०८ में २०२३ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वा. सासवड,ता.फलटण येथे गोविंद पैठणी स्पर्धा (महिलांसाठी) आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि.०८ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आरजे अक्षय प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा (महिलांसाठी कार्यक्रम) प्रमुख उपस्थिती : मराठी सिनेअभिनेत्री मा. प्रार्थना बेहरे, (माझी तुझी रेशीमगाठ फेम नेहा कामत) मराठी सिनेअभिनेत्री मा. ईशा केसकर (जय मल्हार फेम बानू - शनाया) स्थळ : मुधोजी क्लब मैदान, माळजाई मंदिर, फलटण.
दि. ०१ मे ते ३० जुन २०२३ दरम्यान गोविंद कामधेनु उत्कृष्ट संकरीत कालवड निवड स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवार, दि.०९ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता फलटण तालुक्यातील प्रमुख ७५ मंदिरांमध्ये कृष्णेच्या पाण्याने जलाभिषेक व पुजा करण्यात येईल. दुपारी ४ वाजता मुधोजी क्लब मैदानावर ग्रंथतुला व कृष्णेचे पाणी तुला कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता मुधोजी क्लब मैदानावर अभिष्टचिंतन सोहळा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास जिल्ह्यातील तसेच फलटण तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन रामराजे नाईक- निंबाळकर अमृतमहोत्सव अभीष्टचिंतन सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी आमदार दीपकराव चव्हाण, कार्याध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अॅड. रमेशचंद्र भोसले, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, बंटीराजे खर्डेकर, सुभाषराव सूर्यवंशी बेडके, डॉ. विजयराव बोरावके, सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सहसचिवपदी भीमदेव बुरंगले, खजिनदारपदी सुभाषराव धुमाळ, सदस्यपदी बकाजीराव पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, महोदवराव पवार, दिलीपसिंह भोसले, रवींद्र बेडकीहाळ, सह्याद्री कदम, बाळासाहेब सोळस्कर, सुरेश साळुंखे, वसंत गायकवाड, डी. के. पवार, बाळासाहेब कासार, दत्तोपंत शिंदे, हेमंत रानडे, शिरीषकुमार दोशी, हरिष काकडे, अॅड. नरेंद्र भोईटे हे आहेत.
No comments