अमीर व गणेश या मित्रांचा अपघाती मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ - तांबमाळ, फलटण येथे बुलेट व टाटा टिपर या दहा चाकी वाहनाच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये फलटण येथील अमीर ताजुद्दीन शेख व गणेश लोंढे या दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निधनाची बातमी कळताच सर्व फलटणमध्ये शोककळा पसरली होती. फलटणच्या खाऊ गल्लीने संपूर्ण खाऊ गल्ली बंद ठेवत, या दोघांना श्रद्धांजली वाहिली.
अमीर ताजुद्दीन शेख यांनी सुरुवातीच्या काळात गॅरेज व्यवसाय करून पुढे स्वतःचा चायनीज स्टॉल सुरू करून खाद्य व्यवसायात चांगला जम बसवला होता तर गणेश सुनील लोंढे यांनी गॅस एजन्सीत काम केले. त्यानंतर चायनीज स्टॉल सुरू करून त्यांनीही व्यवसायात चांगला जम बसवला. दोघांचे स्वभाव बोलके व मनमिळाऊ असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. आशा दोन जिवलग मित्रांचा मृत्यू एकाच वेळी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दि. १६ मे २०२३ रोजी रात्री ०.०५ वाजता फलटण लोणंद रोडवरील तांबमळा, फलटण येथे लोणंद बाजूकडे गुरू हॉटेलचे पुढील बाजुस, टाटा कंपनीचा दहा चाकी टिपर क्र. एमएच ०९ एफ एल ६०८८ गाडीवरील चालक नामे अमित साह ललनसाह मुळ रा. ग्रामपोस्ट कटराकला थाना मोहानिया जि.कैमुर भभुआँ राज्य बिहार, सध्या रा. आरकेसी प्लँन्ट धुळदेव ता.फलटण जि.सातारा याने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, रस्त्यावरती गाडी भरधाव वेगात चालवुन समोरून येणारे बुलेट गाडी क्र. एम एच ११ सी पी ४७७८ वरील अमिर ताजुद्दीन शेख वय-३२ वर्षे रा.शुक्रवार पेठ फलटण व गणेश सुनिल लोंढे वय-३५ वर्षे रा.मंगळवार पेठ फलटण यांना समोरून जोराची धडक देवुन, त्यांना गंभीर जखमी करून, त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला. तसेच बुलेटचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. असल्याची फिर्याद जमशेद पठाण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
No comments