Breaking News

मुधोजी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची उपस्थिती

Attendance of Bodybuilder Suhas Khamkar at Mudhoji College Annual Prize Distribution Ceremony

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय , फलटणचा सन २०२२-२०२३  या  शैक्षणिक वर्षातील  वार्षिक  पारितोषिक  वितरण समारंभ  शुक्रवार दि.१२ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता जिमखाना विभाग , मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे  होणार असल्याची माहिती  महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य  डॉ.पी.एच. कदम यांनी दिली आहे . सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख  आकर्षण बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील  महाराष्ट्रातील अव्वल खेळाडू,तहसीलदार,मुंबई शहर, आणि  शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुहास खामकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून  महाराष्ट्र राज्य खो- खो  असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे , सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  सह अन्य मान्यवर  उपस्थित राहणार आहेत.

    या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील  शैक्षणिक  वर्ष  २०२२-२३  मधे  क्रीडा  विभाग व सांस्कृतिक  विभागातील   जिल्हा , राज्य , राष्ट्रीय , आंतर विभाग , शिवाजी विद्यापीठ,  कोल्हापूर , अखिल  भारतीय  आंतर विद्यापीठ  स्पर्धा  मधे विशेष प्राविण्य  प्राप्त  खेळाडू  -  कलाकार,    एन.सी.सी.- एन.एस.एस.  , व गुणवत्ताधारक विद्यार्थी यांना पारितोषिके देण्यात  येणार आहेत. यावेळी फलटण तालुक्यातील क्रीडा  क्षेत्रात   उल्लेखनीय कामगिरी करणारे  आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी खेळाडू , कलाकार , गुणवंत विद्यार्थी ,पालक यांनी  वार्षिक पारितोषिक  वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य  डॉ.पी. एच .कदम  यांनी केले आहे .

No comments