Breaking News

संसद भवन उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Attending the opening ceremony of Parliament House was the happiest moment of my life - MP. Ranjitsingh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : नवीन संसद भवन उद्घाटन आणि लोकार्पण, समस्त देशवासीयांसाठी अभिमान व सन्मानाची बाब असून या अभूतपूर्व सोहळ्यास उपस्थित राहून या अनुपम सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले हा आपल्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असल्याच्या भावना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

    नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधी, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले, ही देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब आहे. आज या वास्तूचे लोकार्पण झाले असून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल, असा विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

No comments