भाजपा सातारा जिल्हा प्रभारीपदी माजी खासदार अमर साबळे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मे - आगामी निवडणुका नजरेसमोर ठेऊन भाजपाची तयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने नवीन जिल्हा प्रभारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाच्या प्रभारीपदी माजी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे शहराच्या प्रभारीपदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांची विभाग प्रभारी तसेच उपाध्यक्ष व चिटणीस यांची जिल्हा प्रभारी म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या करण्यात आल्या. विक्रांत पाटील यांची कोंकण विभाग व पालघर जिल्हा, आ. रणधीर सावरकर यांची विदर्भ विभाग, ॲड. माधवी नाईक यांची ठाणे विभाग, श्री. संजय केनेकर यांची मराठवाडा विभाग, श्री. मुरलीधर मोहोळ यांची पश्चिम महाराष्ट्र विभाग, श्री. विजय चौधरी यांची उत्तर महाराष्ट्र विभाग, श्री. माधव भांडारी यांची अहमदनगर उत्तर, अहमदनगर दक्षिण, श्री. चैनसुख संचेती यांची यवतमाळ, पुसद, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, श्री.सुरेश हळवणकर यांची सांगली शहर, सांगली ग्रामीण, श्री. संजय भेगडे यांची सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर, श्री. राजेश पांडे यांची पुणे ग्रामीण, पुणे-मावळ, श्री. अमर साबळे यांची पुणे शहर, सातारा जिल्हा, श्रीमती स्मिता वाघ धुळे शहर, धुळे ग्रामीण, श्री. जयप्रकाश ठाकूर यांची ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर, ठाणे शहर, श्री. संजय भेंडे यांची भंडारा, वर्धा, श्री अतुल काळसेकर यांची नवी मुंबई, उत्तर रायगड, दक्षिण रायगड, श्री. धर्मपाल मेश्राम यांची चंद्रपूर शहर, चंद्रपूर ग्रामीण, गोंदिया, श्री. गजानन घुगे यांची नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, परभणी शहर व परभणी ग्रामीण, श्री. विक्रम पावसकर यांची कोल्हापूर-हातकणंगले, कोल्हापूर पश्चिम, डॉ. अजित गोपछड़े यांची बीड, धाराशीव, हाजी एजाज देशमुख यांची जालना, श्री. राजेंद्र गावित यांची नाशिक शहर, उत्तर नाशिक, दक्षिण नाशिक या ठिकाणी प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
No comments