फलटण येथे कामगारांना मोफत जेवण योजना सुरू

Free meal scheme for workers started at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १५ -केंद्र सरकार संचलित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने फलटण  येथे कामगारांना मोफत जेवण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सर्व कष्टकरी वर्गाने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले आहे.

     ही योजना लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, सद्गुरु हरीबुवा मंदीर समोर, मलठण येथे दि. १५ मे २०२३ पासून  सकाळी ८.३० -  ते ९.३० दरम्यान चालू आहे. कामगारांनी याठिकाणी आपली नोंद करणे गरजेचे आहे.  येताना आपला रिकामा डबा घेऊन येणे.  अधिक माहितीसाठी या 7620408002 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले आहे. या योजनेसाठी बांधकाम कामगार, गवंडी कामगार, बिगारी, हेल्पर, खोदकाम कामगार, प्लंबर, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशन, सुतार,  पेंटर, एक इमारत किंवा घर उभे करण्यात जे कोणी लागतात ते सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

No comments