राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत इम्तियाज तांबोळी यांचे यश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)-अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर व मराठी थिऑसाफिकल फेडरेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत इम्तियाज मुबारक तांबोळी यांच्या 'महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवन व कार्य ' या निबंधास २६ वर्षा पुढील वयोगटात राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी सौ.कल्पना तोडरमल, शिक्षण विस्तार अधिकारी श्री चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख सौ.अलका संकपाळ आदींनी इम्तियाज तांबोळी यांचे अभिनंदन केले आहे.
No comments