रोबोटिक्स तंत्रज्ञान वापरून पहिल्यांदाच गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया - डॉ. प्रसाद जोशी ; जोशी हॉस्पिटल प्रा ली संचालित फलटण रोबोटिक्स सेंटर चा शुभारंभ
जोशी हॉस्पिटल प्रा ली संचालित फलटण रोबोटिक्स सेंटर चा शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रा ली संचालित फलटण रोबोटिक्स सेंटर येथे रोबोटिक्सचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून पहिल्यांदाच दोन गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या. भारतातले तालुका स्तरिय हे पहिलेच रोबोटिक सेंटर आहे असे जोशी हॉस्पिटल प्रा. ली. चे संचालक डॉ प्रसाद जोशी यांनी सांगितले. मोठ्या शहरात सुद्धा ही सुविधा काही मोजक्याच हॉस्पिटलस् मध्ये उपलब्ध आहे. व्हॅलीस रास असे या रोबोटिक मशीन चे नाव आहे. ते जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनी चें असून जर्मन टेक्नॉलॉजी वापरून अमेरिकेत बनवले गेले आहे.
रोबोटिक्स तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना डॉ.प्रसाद जोशी |
जोशी हॉस्पिटल प्रा. ली. संचलित,"फलटण रोबोटिक्स सेंटर"चा दिनांक २५ मे २०२३ रोजी, रोबोटिक्स तंत्रज्ञान वापरून दोन गुडघ्याच्या सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करून, फलटण रोबोटिक्स सेंटर"चा शुभारंभ झाल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. याप्रसंगी डॉ. प्राची जोशी, डॉ. धायगुडे, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे पदाधिकारी व जोशी हॉस्पिटलचे पदाधिकारी उपस्थित होते.
रोबोटिक्स तंत्रज्ञानाद्वारे गुडघ्यांची सांधेरोपण शस्त्रक्रिया करताना डॉ.प्रसाद जोशी |
जोशी हॉस्पिटल प्रा. ली. फलटण येथे गेल्या २३ वर्षापासून खूबे गुढघे खांदे यांचे सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या होत आहेत. आज पर्यंत ४००० हून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया तालुकास्तरीय पातळीवर फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रा. ली. येथे डॉ प्रसाद जोशी यांनी केल्या आहेत.भारतात तालुका स्तरीय पातळीवर एकाच हॉस्पिटल मध्ये एकाच सर्जन नी सर्वात जास्त सांधेरोपण केल्या मुळे २०१७ साली डॉ प्रसाद जोशी यांना इंडियन अचीवर्स अवॉर्ड ने आणि २०१८ साली भारत गौरव अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. २०१९ साली सकाळ ग्रुप नी एक्सलन्स इन ऑर्थोपेडिक हा किताब डॉ प्रसाद जोशी यांना बहाल केला. २०१२ पासून ब्रेन लॅब्स या कंपनी चे कॉम्प्युटर नेवीगेशन हे सांधे रोपणासाठीचे लागणारे जर्मन उच्च तंत्रज्ञान जोशी हॉस्पिटल प्रा ली. फलटण येथे उपलब्ध होतेच आणि ते सुद्धा भारतातील तालुकास्तरीय पहिलेच नेव्हिगेशन मशीन असल्याचे डॉ प्रसाद जोशी यांनी नमूद केले. "रोबोटिक्स' चे तंत्रज्ञान शिकण्यासाठी डॉ प्रसाद जोशी यांनी फ्लोरिडा अमेरिका येथील सर्वात मोठ्या रोबोटिक्स लॅब मध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले आहे. भारतातून त्यासाठी फक्त ७ डॉक्टरांमधून डॉ प्रसाद जोशी यांची त्यासाठी निवड झाली होती.
सध्या जोशी हॉस्पिटल प्रा. ली. येथे सांधेरोपणासाठी सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, लातूर ,नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर, रत्नागिरी, लांजा, गोवा, बांदा, बंगळूर, काशी गया, अमेरिका आणि सौदी अरेबिया हून पेशंट्स येत आहेत.फलटण तालुक्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण असून तालुका स्तरावरील भारतातले हे पहिलेच रोबोटिक सेंटर असल्याने महाराष्ट्रात आणि भारतात फलटण चे नाव नक्कीच उज्ज्वल होईल असा सार्थ विश्वास डॉ. जोशींनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.
जोशी हॉस्पिटलच्या सांधे रोपण तंत्रज्ञानामध्ये एक मानाचा तुरा खोवला गेला आहे आणि या अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ सर्वानाच होईल व तसेच अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरणारा सर्जन आणि त्याचे स्किल हे ही फार महत्त्वाचे आहे असे डॉ प्रसाद जोशी यांनी प्रतिपादन केले.
रोबोटिक्स चा फायदा हा सांधे दुखी च्या सर्व पेशंट्स ना लवकर आणि दीर्घ काळ बरे राहण्यासाठी होईल असे सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी नमूद केले.
रोबोटिक्स चे तीन ठळक फायदे खालील प्रमाणे :- १. सांधेरोपणासाठी लागणारे हे सर्वात आधुनिक ( Latest & Advanced ) तंत्रज्ञान आहे. २. त्यामुळे सांधेरोपणातील मिळणारी अचूकता ( Perfection) ही साधली जाते. 3. Patients लवकर बरा होऊन दीर्घ काळ दुःख विरहित राहतो. अशा तंत्रज्ञानाचा फायदा हा सर्वांनाच असा विश्वास डॉ जोशी यांनी बोलून दाखविला.
No comments