प्रतिबंधित गुटखा-पान मसाला : ३२ हजार ९१३ रुपयांचा माल जप्त ; फलटण मध्ये २ ठिकाणी छापे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १५ - प्रतिबंधित असणारे गुटखा, विमल पान मसाला व वी वन तंबाखू या उत्पादनाचा साठा, विक्री व वाहतूक करताना दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ३२ हजार ९१३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, फलटणमध्ये दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईमध्ये दिनांक १३/५/२०२३ रोजी रात्रौ ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर, रिंगरोड, फलटण येथे आकाश सुकुमार दोशी रा शिवाजीनगर, फलटण व महेन्द्रं कुडुमकर उर्फ आण्णा रा. लक्ष्मीनगर, फलटण यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी तंबाखु यांचे उत्पादन साठा वितरण किंवा विक्री हेतुसाठा व वाहतूक केली असल्यामुळे यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा व मानके २००६, अन्न सुरक्षा व मानके (प्रोहिबीशन & रेस्ट्रीक्शन्स ऑन सेल्स) २०११ तसेच सदर प्रतिबंधीत अन्नपदार्थ हे आरोग्यास अपायकारक आहेत हे माहित असुन देखील त्याची विक्री करण्या करीता वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने भा.द.वि.सं. कलम १८८ व तसेच कलम २७२, २७३, ३२८ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून १) केसर युक्त विमल पानमसाला एकुण साठा- ९२.४ ग्रँमचे ८० पुडे एकुण वजन ७३९२ ग्रॅम एकुण किमंत रुपये ९६००/-२) वी वन टॅबको एकुण साठा अंदाजे १० ग्रँमचे १०० पुडे एकुण वजन १००० ग्रँम एकुण किंमत रु ३०००/- ३)केसर युक्त विमल पानमसाला (लाल) एकुण साठा १३७.५ ग्रॅमचे ३६ पुडे एकुण ४९५० ग्रॅम एकुण किमंत रु ७१२८/- ४) वी वन टॅबको (लाल)-एकुण साठा -अंदाजे १० ग्रँमचे ३३ पुडे एकुण वजन ३३९ ग्रॅम एकुण किमंत रु ७२६ असे एकूण साठा वजन १३६७२ ग्रॅम मुद्देमाल जप्त केला त्याची एकुण किमंत २०४५४ रुपये आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
दुसऱ्या कारवाईमध्ये, दिनांक १३/५/२०२३ रोजी रात्रौ ८.४० वाजण्याच्या सुमारास गजानन चौक, फलटण येथे तोसीफ अब्दुल शेख रा: गोल्डन बेकारी शेजारी, गजानन चौक, शुक्रवार पेठ, फलटण व महेन्द्रं कुडुमकर उर्फ आण्णा रा. लक्ष्मीनगर, फलटण यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी तंबाखु यांचे उत्पादन साठा वितरण किंवा विक्री हेतुसाठा व वाहतूक केली असल्यामुळे यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा व मानके २००६, अन्न सुरक्षा व मानके (प्रोहिबीशन & रेस्ट्रीक्शन्स ऑन सेल्स) २०११ तसेच सदर प्रतिबंधीत अन्नपदार्थ हे आरोग्यास अपायकारक आहेत हे माहित असुन देखील त्याची विक्री करण्या करीता वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने भा.द.वि.सं. कलम १८८ व तसेच कलम २७२, २७३, ३२८ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून १)केसर युक्त विमल पानमसाला एकुण साठा- ९२.४ ग्रँमचे ८३ पुडे एकुण वजन ७६६९ ग्रॅम एकुण किमंत रुपये ९९६०/- २) वी वन टॅबको एकुण साठा अंदाजे १० ग्रँमचे ८३ पुडे एकुण वजन ८३० ग्रँम एकुण किंमत रु २४९०/- असे एकूण साठा वजन ८४९९ ग्रॅम मुद्देमाल जप्त केला त्याची एकुण किमंत १२४५९ रुपये आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
No comments