Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समितीवर राजे गटाचेच वर्चस्व

Raje group rule over Agricultural Produce Market Committee

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी, विरोधकांना चितपट करत, सर्वच्या सर्व म्हणजे १८ जागा जिंकत, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.  

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत  ४ जागा बिनविरोध जिंकून विजयाची सुरवात केलेल्या राजेगटाने  दि.१ मे रोजी झालेल्या मतमोजणीत  १४ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून आपले वर्चस्व अबाधित असल्याचे दाखवून देत विरोधी उमेदवारांना आस्मान दाखविले आहे. या निवडणुकीतील सोसायटी मतदारसंघात  सर्वाधिक मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाचे सर्व ७ उमेदवार विजयी झाले. ज्ञानदेव बाबासाहेब गावडे १२४१, शरद लक्ष्मण लोखंडे १२३८, चेतन सुभाष शिंदे १२३३, दीपक विठोबा गाँड १२२५, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर १२२३, शंभूराज विनायक पाटील ११९८, भगवान दादासाहेब होळकर १९९६.

     सोसायटी मतदारसंघातून सुनीता चंद्रकांत रणवरे १२५१ आणि जयश्री गणपत सस्ते १२२५ मते घेऊन विजयी झाले. सोसायटी मतदारसंघातून वि.जा.भ.ज. -  भीमराव पोपटराव खताळ विजयी झाले.  ग्रामपंचायत मतदारसंघात किरण सयाजी शिंदे ८१७ आणि चांगदेव कृष्णा खरात ८१५ मते घेऊन विजयी झाले.  अनुज्ञाप्तीधारक व्यापारी आडते मतदारसंघात  संजय हरिभाऊ कदम ६८ आणि समर दिलीप जाधव ६१ मते घेऊन विजयी झाले. 

     इतर मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातून तुळशीराम दशरथ शिंदे, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून शामराव अक्षय गायकवाड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी राखीव मतदारसंघातून संतोष मल्हारी जगताप आणि हमाल मापाडी मतदारसंघातून नीलेश सुरेश कापसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनेलचे (राजे गट) ४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

     निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनेलचा (राजे गट) जयघोष करत सर्वांनी जल्लोष केला.

No comments