कॅफे शॉप करिता नियमावली जारी
सातारा दि. 10 : जिल्ह्यातील कॅफे शॉप (कॉफी कॅफे) करिता जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदी नुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 12 मे 2023 ते दि. 30जून 2023 रोजीच्या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
कॅफे शॉप मधील पुर्ण बैठक व्यवस्था सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याचे कक्षेत यावी अशी सी.सी.टी.व्ही यंत्रणा बसविणे बंधनकारक राहील. कॅफे शॉप मधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकाचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत. कॅफे शॉप मधील सर्व बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी. कॅफे मध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या ग्राहकांच्या नोंदी करण्यासाठी रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेणे बंधनकारक असेल. तसेच पोलीस व्हिजीट बुक नोंदवही ठेवणेत यावी. कॅफे शॉप मध्ये कोणतेही गैरकृत्य करणेस मनाई असेल. असे गैरकृत्य कॅफे मध्ये होवू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना कॅफे शॉप मालक/चालक यांनी करावी.
No comments