ग्रामपंचायत जाधववाडीच्या उपसरपंचपदी दिपकराव सपकळ
![]() |
उपसरपंचपदी दिपकराव सपकळ यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - ग्रामपंचायत जाधववाडी ता. फलटण च्या उपसरपंच पदी दिपकराव जगन्नाथ सपकळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दीपक सपकळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ग्रामपंचायत जाधववाडीचे उपसरपंच श्री. सचिन सायबु मदने यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदी, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिपकराव जगन्नाथ सपकळ यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी पॅनल प्रमुख चंद्रकांत (नाना) जमदाडे, सरपंच श्रीमती सिमा आबाजी गायकवाड, भगवान दादा लकडे, सारिका संदीप चव्हाण, सोनाली विक्रम पवार, सचिन सायबु मदने, ग्रामविकास अधिकारी विजयराव निंबाळकर उपस्थित होते.
दिपकराव सपकळ यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर, दिपकराव सपकळ यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांचे आभार व्यक्त केले व मला उपसरपंच पदी जी संधी दिली आहे, त्या संधीचे मी सोने करेन. उपसरपंच पदास शोभेल असेच काम मी करेन, सर्व ग्रामस्थ व लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिपकराव सपकळ यांनी स्पष्ट केले.
No comments