उपळवे येथे ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या ट्रॅक्टर गाडी जुगाडांची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ मे - मौजे उपळवे ता. फलटण येथून स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लि उपळवे या साखर कारखाण्याचे ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे ३ ट्रॅक्टर गाडी (जुगाड) चोरून नेल्याप्रकरणी माळेगाव ता. शिरूर कासार जि. बीड येथील एका जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, अंबादास बाळू सांगळे माळेगाव ता. शिरूर कासार जि. बीड याने दिनांक १०/३/२०२३ रोजीचे संध्याकाळी ८ वाजता ते ता. ११/३/२०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान, मौजे उपळवे ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीत कॅनॉलचे पुला जवळील तळावरून, प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ३ ट्रॅक्टर गाडी जुगाड असे एकूण ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची फिर्याद विनय राजेंद्र पुजारी रा. उपळवे ता. फलटण यांनी दि.३/५/२०२३ रोजी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार राऊत हे करीत आहेत.
No comments