अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याची दिली धमकी ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ मे - सोनगाव तालुका फलटण येथे एका अल्पवयीन मुलीचा हात धरून, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत, माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली नाहीस तर तुझे फोटो मी इंस्टाग्राम वर टाकील अशी धमकी देणाऱ्याच्या विरुद्ध विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, दि. १५/२/२०२३ ते दि.३०/४/२०२३ दरम्यान अमित चंद्रकांत निकाळजे रा. सोनगाव ता. फलटण याने, सोनगाव येथील अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना, वाघाचीवाडी, सांगवी येथे अमित निकाळजे याने पाठीमागून येऊन, अल्पवयीन मुलीचा हात धरून, तू मला जास्त आवडतेस, तू माझ्यासोबत रिलेशन मध्ये राहा असे म्हणून त्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तसेच तू जर माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली नाहीस, तर तुझे फोटो मी इंस्टाग्राम वर टाकील अशी धमकी दिली असल्याची फिर्याद दि. २/५/२०२३ रोजी अल्पवयीन मुलीने दिली आहे. अमित निकाळजे याच्या विरोधात भा.द.वि.सं. अंतर्गत व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित हे करीत आहेत.
No comments