Breaking News

पत्नीचा विनयभंग तर जाब विचारणाऱ्या पतीस जातीवाचक शिवीगाळ

Woman molested in Surawadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ :  पत्नीशी लगट का केली याचा जाब विचारायला गेलेल्या नवऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करुन तेथून हाकलून देण्याची धमकी दिल्याने १५ फाटा, सुरवडी ता. येथील पिता, पुत्रावर ग्रामीण पोलिस ठाण्यात विनयभंग व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद झाला आहे. रवींद्र हनुमंत जगताप व हनुमंत निवृत्ती जगताप दोघेही रा. सुरवडी १५ फाटा ता. फलटण आशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत.

    याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती नुसार, दि. ७ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास १५ फाटा, सुरवडी येथे, एक महिला कॅनॉलला कपडे धुण्यासाठी गेली होती, त्यावेळी तीच्याशी रविंद्र जगताप याने लगट करुन, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबतची विचारणा करण्यासाठी सदर महिलेचा पती गेला असता त्यास रविंद्र जगताप व त्याचे वडिल हनुमंत जगताप यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन तेथून हाकलून देण्याची धमकी दिली. पुढिल तपास पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे करीत आहेत.

No comments