Breaking News

स्वागत काशीद व पोलीस प्रशासना विरोधात २ जुलै रोजी फलटण बंदची हाक

उपविभागीय अधिकारी फलटण यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी व दलित पॅंथर चे पदाधिकारी
A case should be registered against Swagat Kashid; Phaltan bandh on July 2 by Vanchit Bahujan Aghadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ जून - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार  ॲड. प्रकाश आंबेडकर  यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल कोळकी ता. फलटण येथील स्वागत काशीद याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणी  पोलीस प्रशासनाने कोणतीही कायदेशीर कारवाई न केल्यामुळे,  स्वागत काशीद व पोलीस प्रशासना विरोधात  फलटण बंदची हाक वंचित बहुजन आघाडी फलटण शहर व दलित पँथर यांनी दिली आहे. त्या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी फलटण यांना देण्यात आले आहे.

    वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी फलटण यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण येथील स्वागत काशीद याने जातीय सलोखा बिघडवण्याच्या हेतूने श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अश्लील शिवीगाळ करून समस्त बौद्ध समाजाच्या भावना दुखवून, तेढ निर्माण करून, शत्रुत्वाच्या हेतूने, प्रक्षोभक पोस्ट व फोटो टाकल्यामुळे तसेच फलटण शहर पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्यामुळे, स्वागत काशीद व पोलीस प्रशासनाच्या विरोधात फलटण तालुक्यातील तमाम बौद्ध समाज व आंबेडकरी अनुयायी, बहुजन समाज निषेध करण्यासाठी रविवार दिनांक २ जुलैला फलटण बंद आंदोलन करीत आहे, होणाऱ्या गंभीर उद्रेकास फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी हे कारणीभूत असतील. तरी स्वागत काशीद व संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे, महिला शहराध्यक्षा सौ.सपना भोसले,  मा. उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, राजाभाऊ घोरपडे, दलित पँथरचे राज्य सचिव रोहित विलास अहिवळे, तालुकाध्यक्ष रोहित यशवंत अहिवळे, उपाध्यक्ष दत्तात्रय आवडे व अन्य भीमसैनिक उपस्थित होते.

No comments