फलटण सेशन कोर्टास मान्यता ; खासदार रणजीतसिंह यांच्या प्रयत्नाला यश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ जून - फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय व्हावे अशी मागणी कित्येक वर्षांपासून फलटण वकील संघटना व नागरिकांची होती. या प्रलंबित प्रश्नासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने फलटण सत्र न्यायालयास मान्यता मिळाली व आज कॅबिनेटमध्ये त्याला फायनल मंजुरी मिळाली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य जयकुमार शिंदे यांनी दिली.
फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय मंजूर झाल्याचे समजताच फलटण शहरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, फलटण येथे मंजूर झालेल्या सत्र न्यायालयामुळे तालुक्यातील वकील व नागरिकांना सातारा फेऱ्या बंद होणार आहेत. साताऱ्याला जाऊन लोकांना हाल अपेष्टा, वेळ वाया जात होता तो आता फलटणमध्ये जिल्हा न्यायालय झाल्यामुळे या सर्व गोष्टीचा फायदा फलटणच्या जनतेला होईल व यामुळे वकील वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण असल्याचे जयकुमार शिंदे यांनी कळविले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आरटीओ कार्यालय व्हावे अशी मागणी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कडे केली आहे.
No comments