स्वागत काशीद वर गुन्हा दाखल करावा!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ जून - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल कोळकी ता. फलटण येथील स्वागत काशीद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फलटण पोलीस स्टेशन कडे गेली आहे. स्वागत काशीद याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विविध संघटनां व पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक १८ जून रोजी दुपार पासून फलटण शहर पोलीस स्टेशनला गर्दी केली होती. दरम्यान ज्या व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट शेअर केली त्यासंदर्भात चौकशी करून संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले.
विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत काशीद याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी फलटण शहर पोलीस स्टेशन कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज दि. १८/०६/२०२३ रोजी रोहन शिंदे मित्र परिवार या व्हाट्सअप ग्रुपवर स्वागत काशीद (रा. नरसोबानगर, कोळकी, फलटण) या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीने हेतुतः जाणून बुजून, मागासवर्गीय माणसाचा व सामाजाचा अपमान करण्याच्या आणि त्याच बरोबर लोकांना भडकावून सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने एकदम खालच्या दर्जाचे अपशब्ध/शिव्या मा. श्रध्देय प्रकाशजी आंबेडकर यांना दिलेल्या आहेत.
सदर घटनेचे सर्व आवश्यक पुरावे उपलब्ध आहेत. परिणामी आपणास विनंती आहे कि, स्वागत काशीद याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा चे कलम 3 (1) (आर) आणि भारतीय दंड संहि 1860 चे कलम 500 आणि इतर संबंधित कायदे व कलम, अंतर्गत त्वरित गुन्हा (FIR) नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई करावी.
No comments