वारकऱ्यांना फलटणकरांकडून थंड पाण्याचा पूरवठा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० जून - दि २०/०६/२०२३ रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. मान्सून लांबल्यामुळे व उन्हाचा तडाखा असल्यामुळे यंदा वारकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारकऱ्यांची उष्णतेच्या त्रासापासून काही प्रमाणात सूटका व्हावी म्हणून फलटण प्रशासन व तालुक्यातील काही दूध डेअरी यांनी वारकऱ्यांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये गोविंद डेअरी, हेरिटेज डेअरी व कुटे ॲन्ड सन्स डेअरी यांनी त्याचेकडील टॅंकर्सने स्वच्छ व थंड पाणी पालखी मार्ग, विसावे यांच्या १८ ठिकाणी उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी कळवली आहे.
तसेच प्रशासनातर्फे फलटणमधील इतरही दानशूर व्यक्ती , संस्था यांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments