Breaking News

आंध्रप्रदेशचे पोलीस महासंचालक यांची के. बी. कंपनीस भेट

  श्री. सचिन यादव यांच्या समवेत श्री मदिरेड्डी प्रताप (DGP)
Director General of Police of Andhra Pradesh visited Kay Bee Company

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आंध्र प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस पडलेल्या व खऱ्या अर्थाने के. बी. कंपनीची सेंद्रिय कीटकनाशके ही रासायनिक औषधांना एक सशक्त पर्याय निर्माण झाला असल्याची आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी वर्गातील चर्चा ऐकून व त्याच उत्सुकते पोटी, भारतातील पहिली बोटॅनिकल आधारित सेंद्रिय-कीटकनाशके उत्पादित करणाऱ्या के. बी. उद्योग समूहाच्या फलटण, जिल्हा सातारा येथील युनिट ला आंध्रप्रदेश राज्याचे पोलीस महासंचालक श्री मदिरेड्डी प्रताप (DGP) आणि त्याची संपूर्ण टीम यांनी भेट दिली. यावेळी कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन यादव सर यांनी त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. 

    यावेळी मदिरेड्डी प्रताप यांनी के. बी. बायोमधील कीटकशास्त्र लॅब,  पॅथॉलॉजी विभाग, अॅनालिटिकल लॅब, बॅक्टेरियल लॅब, 5KL आणि 3 KL प्लांट एक्सट्रॅक्शन युनिट, 100x आयुर्वेद उत्पादन युनिट, सप्लाय चैन यूनिट, PGR पॉलीहाउस फील्ड ट्रायल याठिकाणी भेट दिली. कंपनीच्या सर्व प्रतिनिधींनी त्यांना सर्व यूनिट आणि उत्पादनांची माहीती सांगितली.   

    “सेंद्रिय शेती हीच खरी शाश्वत शेती आहे" तसेच आरोग्यास पोषक शेती माल देण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टीकवून ती वाढवण्यासाठीची कृषी उत्पादने तयार करण्याचे काम के. बी. कंपनीने केले आहे आणि भारत देशातील अशी पहिली कंपनी आहे, जी रसायनमुक्त शेती, माती आणि शेतकरी हित असे ध्येय समोर ठेऊन उत्कृष्ठ काम करत आहे तसेच आपले काम घेऊन सर्व राज्यात पोहचत आहे” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना केले. के. बी. कंपनीची सेंद्रिय उत्पादने वापरून देशातील शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची  कास धरावी असे त्यांनी प्रतिपादन केले तसेच रासायनिक औषधांना सध्याच्या काळात आणि भविष्यातही के. बी. कंपनीची सेंद्रिय कीटकनाशके ही एकमेव व उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी के. बी बायोचे डायरेक्टर मा. श्री. सचिन यादव सरांचे आणि के. बी. कंपनीचे खूप खूप अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments