Breaking News

डॉ. बी.आर.आंबेडकर आय.आय.टी. येथे निर्भया पथकाकडून विद्यार्थिनींना मार्गदर्शन

विद्यार्थिनीं समवेत निर्भया पथकाच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभवी भोसले, कॉन्स्टेबल दत्तात्रय भिसे, संस्था चालक शेखर कांबळे, सौ. मनीषा कांबळे 
Nirbhaya Team Mentoring Students at Dr. BR Ambedkar I.I.T. 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - निर्भया पथक फलटण डिव्हिजन यांच्यावतीने डॉ. बी.आर.आंबेडकर आय.आय.टी.  फलटण या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून, मुलींना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा केली.  मुलींच्या संदर्भात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन सोशल मीडिया, मोबाईलचा वापर व वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. निर्भयाचा मोबाईल नंबर, हेल्पलाइन नंबर देऊन मुलींना काही अडीअडचणी असल्यास डायल ११२ वर कॉल करावा करण्याचे आवाहन निर्भया पथकाकडून करण्यात आले.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना निर्भया पथकाच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभवी भोसले 

    उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक फलटण डिव्हिजनच्या हेड कॉन्स्टेबल वैभवी प्रमोद भोसले, कॉन्स्टेबल दत्तात्रय भिसे यांनी डॉ. बी.आर.आंबेडकर आय.आय.टी, फलटण एसटी स्टँड ,मुधोजी हायस्कूल, मुधोजी कॉलेज , माळजाई मंदिर परिसर याठिकाणी सक्त पेट्रोलिंग करून,  मुलींच्या अडचणी बाबत चर्चा करून त्यांना मार्गदर्शन व समुपदेशन केले. यावेळी संस्था चालक शेखर कांबळे, सौ. मनीषा कांबळे उपस्थित होते. 

  कळत नकळत आपल्या हातून एकदा गंभीर गुन्हा घडू नये, कारण त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारे पासपोर्ट वेरिफिकेशन तसेच पोलीस वेरिफिकेशन या गोष्टी होत नाहीत. आणि भविष्यात येणार येणाऱ्या अडचणींना विद्यार्थी तसेच पालक यांना सामोरे जावे लागेल, त्यामुळे कोणताही गुन्हा आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यावी. काही अडचण असेल तर त्वरित निर्भया पथकास, जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा ११२ हा क्रमांक डायल करून माहिती कळवावी असे आवाहन यावेळी निर्भया पथकाकडून करण्यात आले.

No comments