सचिन ढोले फलटणचे नवीन प्रांत तर अभिजीत जाधव नवीन तहसीलदार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांची बदली होऊन, त्यांच्या जागी सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सचिन ढोले यांनी फलटण उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले सचिन ढोले हे २००४ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
यापूर्वी त्यांनी नागपूर येथील मिहान प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी , नागपूर ग्रामीण येथे उपविभागीय अधिकारी , तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक,पुणे येथे अन्नधान्य वितरण अधिकारी ,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच
पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले असून, आषाढी व कार्तिकी वारीच्या नियोजनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. ते पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी असताना त्यांच्या काळामध्ये पालखी महामार्गाचे भूसंपादन व श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आराखड्याचे काम त्यांनी केले आहे. प्रशासकीय कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्याचप्रमाणे
फलटणचे तहसीलदार समीर यादव यांची देखील बदली होऊन त्यांच्या जागी अभिजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अभिजीत जाधव हे सोमवारी फलटण तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारणार आहेत . वैद्यकीय अधिकारी असलेले अभिजित जाधव हे २०१७ च्या बॅचचे अधिकारी आहेत.यापूर्वी त्यांनी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयात पुनर्वसन तहसीलदार म्हणून तसेच जळगाव तालुक्यात अप्पर तहसीलदार म्हणून काम केले आहे.अल्प काळात त्यांनी उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला असून प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे.
No comments