संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे फलटणमध्ये भक्तिमय वातावरण स्वागत
टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत सोहळा ऐतिहासिक अशा फलटणमध्ये आला. लाखो वारकऱ्यांच्या मुखातून माऊली..... माऊली.... नामाचा अखंड जागर सुरू होता. पालखी सोहळा शहराच्या वेशीवर पोहोचला. तेथे फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले, उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजीत जाधव, फलटण नगर परिषदेत मुख्याधिकारी संजय गायकवाड व शहरवासियांनी माऊलींसह वैष्णवांचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे फलटण शहरात ५.३० वाजता आगमन झाले. पालखी सोहळा मलटण, सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक मार्गे सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिराजवळ पोहोचला. अश्वांचे व माऊलींसह वैष्णवांचे इथे नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत व दर्शन घेतले याप्रसंगी शामराव निकम, दशरथ यादव, अॅड. अभिजीत मोहिते, किशोरसिंह नाईक निंबाळकर, महादेव माने, सौ प्रगती कापसे, तुषार नाईक निंबाळकर, अमोल पवार, अभिजीत निंबाळकर, हरिभाऊ पेटकर ,डॉ. राजवैद्य,अॅड. महेंद्र नलवडे, रवींद्र यादव, डॉ. रसाळ तसेच फलटण शहरवासीयांनी माऊलींचे स्वागत केले व दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कामगार कॉलनी या मार्गाने विमानतळावरील प्रशस्त पालखी तळावर विसावला.
पालखी सोहळा विमानतळ येथे विसावल्यानंतर,सायंकाळी प्रशासनाच्यावतीने सोहळ्यातील मानकरी व विश्वस्तांचे शाल, श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर समाज आरती होवून सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येथे विसावला. उद्या गुरुवारी सकाळी सोहळा जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी बरड ता. फलटणकडे प्रस्थान ठेवेल.
No comments