विवाहितेची आत्महत्या ; 'ती' पोलीस नाहीच
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - नागेश्वरनगर, मलठण फलटण येथे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान सदरची विवाहिता ही मुंबई पोलीस मध्ये असल्याचे तिचे नातेवाईक व परिसरातील नागरिक सांगत होते. त्या दृष्टीने फलटण शहर पोलिसांनी तपास केला असता, सदरची विवाहिता ही मुंबई पोलीस मध्ये नसल्याचे चौकशीत समोर येत असल्याचे फलटण शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले असून, अद्याप या प्रकरणाचा तपास चालू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२४/०६/२०२३ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान विवाहिता ऋतुजा सुशांत रासकर वय २२ वर्षे रा. नागेश्वरनगर, फलटण जि.सातारा हिने नागेश्वरनगर येथे रहात्या घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीने गऴफास घेतल्याने, ती मयत झाली असल्याची फिर्याद विवाहितेचे सासरे बाऴु दादा रासकर यांनी दिली आहे. अधिक तपास स.पो.नि. केनेकर करीत आहेत.
No comments