Breaking News

स्वराज सर्वाधिक ऊसदर देणारा खाजगी साखर कारखाना - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

रोलर पूजन करताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर
Swaraj is a private sugar factory that pays the highest price - MP. Ranjit Singh Naik Nimbalkar

       फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ जून : स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचालित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर  साखर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता आता ८ हजार मे. टन इतकी झाली असून तालुक्यातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक ऊस दर देणारा साखर कारखाना म्हणून लोकप्रिय असलेला हा कारखाना ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र ठरल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

          स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचालित संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याचे रोलर पूजन खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले. 

            गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाची एफ. आर. पी. प्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम ऊस उत्पादक  शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असून फलटण तालुक्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत आपण सर्वाधिक दर दिला आहे, एफ. आर. पी. पेक्षा अधिक देणार असलेल्या दरातील उर्वरित रक्कम (दुसरा हप्ता) लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची ग्वाही यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

        ५०० के. एल. पी. डी. क्षमतेची अर्कशाळा इथेनॉल प्लांट उभा करण्यात आला असून हंगाम २०२३ - २४ मध्ये वाढीव गाळप क्षमतेला पुरेसा ठरेल इतका ऊस पुरवठा होण्याचे दृष्टीने ऊस तोडणी वाहतूकीसाठी आवश्यक  ट्रक, ट्रॅक्टर  करार करण्याची कार्यवाही सध्या सुरु असून त्याप्रमाणात तोडणी वाहतूक कर्मचारी उपलब्ध होण्यात कसलीही अडचण नसल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

    साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी कारखान्याच्यावतीने प्रत्येकी २ लाख रुपयांची कौटुंबिक मेडिक्लेम पॉलिसी तसेच दहा लाख रुपयांचा अपघात विमा पॉलिसी देण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत आगामी काळात लोकनेते साखर कारखाना हा सर्वार्थाने परिसर विकासाचे केंद्र ठरेल असा विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

        कार्यक्रमास संचालक विनय ठाकूर, सौ. उषा घाडगे,असिस्टंट जनरल मॅनेजर,विजयकुमार थोरात,अमर जगताप, संजय पवार जनरल मॅनेजर (अर्कशाळा), शंकर कदम जनरल मॅनेजर केन,समाधान गायकवाड  चीफ इंजिनिअर,प्रदीप सक्सेना चीफ केमिस्ट,प्रदीप मोहिते, नितीन कर्णे, सचिन सावंत, रोहित नागटीळे, दादा जगदाळे विनय पुजारी, सचिन शेंडगे,संजय कर्वे, सागर मुलीमनी व कर्मचारी ,ऊस तोडणी वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकरी, भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments