Breaking News

दूरदृष्टीच्या नेतृत्वाने अनेक पिढ्या दुष्काळी असलेला भाग बागायतदार केला

The visionary leadership turned the drought-stricken area into horticulture

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ जून - विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कार्याचा आढावा टीम श्रीमंत रामराजे यांनी घेतला असून, सादर पोस्ट सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर सदर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात  आला आहे. 

    विधान परिषद सभापती, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, फलटण चे खंबीर नेतृत्व आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजांनी नुकतीच वयाची पंचहत्तरी पूर्ण केली. मागच्या काही दशकांची त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. त्यात त्यांनी प्रदेशाच्या व नागरिकांच्या सेवेसाठी अविरतपणे संघर्ष व कार्य केले. त्यांच्या या कार्याचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

    सततचा दुष्काळ, जगण्यातील उदासीनता आणि शेतकरी, कष्टकरी यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या कार्यकर्तृत्वातून उभा राहिलेल्या धरणप्रकल्प क्षेत्रातील आर्थिक सुबत्ता पाहिल्यावर, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक यशाबद्दल प्रत्येकाला कमालीची उत्सूकता लागून राहते.

    पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणारे अनेक तालुके आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे रामराजेंच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या धोम बलकवडी, नीरा देवघर सारख्या प्रकल्पांमुळे कायमस्वरूपी बागायतदार झाले आहेत. 

    निरा- देवघर  फलटण आणि आजूबाजूच्या तालुक्यासाठी तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. गेली अनेक वर्ष या धरणाच्या संबंधित विषयाभोवती रामराजे नाईक- निंबाळकर साहेबांचं राजकीय आणि सामाजिक जीवन राहिलेले आहे.

१९९६ साली निरा देवधर या धरणाचे काम सुरू झाले. धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूर या भागाला तर उजव्या कालव्यातून फलटण, माळशिरस आणि पंढरपूर या भागाला पाणी पोहोचवले गेले., १९९६ साली रामराजे नाईक- निंबाळकर हे आमदार म्हणून निवडून आले. यावेळी कृष्णा लवादा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. ३१ मे २००१ पर्यंत कृष्णा खोऱ्याच्या न वापरलेल्या पाण्यासंबंधी पुनर्विचार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पाठींबा व विविध प्रशासकीय मान्यता मिळवल्या. दरम्यान, पुनर्वसनाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध होता. 

१९९३ रोजी प्रत्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना नागरिकांनी उद्घाटनाला येवू दिले नव्हते अशा परिस्थितीत या भागात स्वतः रामराजे नाईक निंबाळकर यांनी जातीने लक्ष देत लोकांशी संवाद साधत, त्यांना पुनर्वसनाचा विश्वास दिला. प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढत, अनेक अडचणी सोडवत अकरा वर्षाचा काळ निघून गेला आणि २००७-०८ या वर्षात धरण पूर्ण झाले. लोकांना विश्वासात घेऊन त्यांना या पाण्याचे व या धरणाचे महत्त्व पटवून देण्यात रामराजे नाईक निंबाळकर यांना यश आलं. संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्थानिक नागरिक, आमदार आणि प्रशासनासह पुनर्वसन प्रक्रियेतील तुटलेल्या २२-२३ गावांच्या योगदानातून हे स्वप्न पूर्ण झाले. याचा लाभ सातारा, सोलापूर जिल्हातील गावांना मोठ्या प्रमाणात झाला.

    पाण्याच्या विषयात आदरणीय रामराजे प्रसंगी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात उभे राहिले आणि प्रदेशाला न्याय मिळवून दिला. २००४ रोजी डाव्या कालव्याला जास्त पाणी मिळण्याच्या संदर्भात संघर्ष झाला. त्यावेळी आणि मा.श्री. अजित दादा पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीवेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी दादांच्या निर्णयाला विरोध करताना या निर्णयावेळी आम्हाला जर पाणी कमी पडले तर आम्ही हे ऐकणार नाही. या अटीवर तुम्हाला हा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता अन्यथा हा आमच्यावर अन्याय होईल, असे आपले मत त्यांनी आपल्या फाईल वरती स्पष्ट नमूद केले. 

    पण, या पाणी वाटपामुळे फलटण तालुक्यातील गावांना कधीच पाण्याची कमतरता भासली नाही. २००४ साली २ कारखाने असलेल्या फलटण तालुक्यात आज ४ कारखाने उभे राहिले आहेत, परिसरात शेतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत, ऊस क्षेत्राचे प्रमाण वाढले आहे, प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे हे सर्व आदरणीय रामराजेंच्या प्रयत्नातून मिळालेल्या या पाण्यामुळेच शक्य झाले आहे. ऊस क्षेत्राचे प्रमाण वाढले. मुबलक पाणी मिळाल्यामुळे शेतीच्या विविध प्रयोग होत गेले. त्याचप्रमाणे, प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला.

    कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेच्या नंतर ज्यावेळी कालवा की स्टोरेज हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रामुख्याने भूमिका घेत स्टोरेज आणि कालवे यात त्यांनी स्टोरेजला महत्त्व दिलं आणि यामुळेच आज फलटणमधील पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. या संपूर्ण पाण्याचा लाभ फलटण तालुका, सांगोला तालुका, माळशिरस, पंढरपूर, बारामती, इंदापूर अशा सर्वच तालुक्यांना झाला.

    कुकडी, उजनी, कोयना, वारणा या आणि अशा इतर योजना उभा राहत असताना देखील आदरणीय रामराजेंच्या प्रभावी नेतृत्वामुळे साताऱ्यासाठी १२० टीएमसी पाणी वाचलं. याच दरम्यान ८१ टीएमसी जास्तीचे पाणी फलटण तालुक्याला मिळाले. हे त्यांच्या तीस वर्षाच्या कारकीर्द सर्वोच्च यश आपल्याला म्हणता येईल. 

    कृष्णा खोरे महामंडळाच्या बाबतीतही आपली भूमिका मांडत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुधोजी क्लब ग्राउंड येथे २२ आमदारांच्या साथीने पत्रातून पाण्याची मागणी केली. आम्हाला कोणतेही मंत्रीपद नको, आम्हाला फक्त पाणी हवं या एका मागणीसाठी संपूर्ण २२ आमदार एकत्र झाले. हा या संपूर्ण पाणी प्रश्नाच्या संबंधी रामराजे नाईक निंबाळकर यांनी घडवून आणलेले एतिहासिक यश म्हणता येईल.

    सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी भागाला पाणीप्रश्नातून मुक्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण राजकीय शक्तीचा वापर करीत पाणी आणि फक्त पाणी या विषयाला जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करत त्यांनी अविरतपणे संघर्ष केला. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या सक्षम व खंबीर नेतृत्वामुळे आज फलटण तालुक्यात विकसगंगा वाहत आहे.
- टीम श्रीमंत रामराजे


No comments