Breaking News

श्रीराम विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केला विठ्ठल- रुक्मिणी देखवा

Vitthal-Rukmini Dekhava performed by the students of Sriram Vidya Bhavan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - संत श्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज पालखी मार्गावरील महात्मा फुले चौक फलटण येथे महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन मधील चिमुकल्यांनी सादर केलेला विठ्ठल- रुक्मिणी देखवा भाविक भक्तांसह दिंडीतील वारकऱ्यांना साक्षात विठुराया भेटल्याचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.देखावा सादर करण्याचे शाळेचे १५ वे वर्ष आहे.

    प्रारंभी संस्थेचे सचिव रवींद्र बेडकिहाळ यांनी सोहळ्याचा शुभारंभ केला. इ.७ वीतील विनय खोमणे याने विठ्ठल आणि सिद्धी भोसले हिने रुक्मिणीचा पोशाख परिधान करून दर्शन सोहळा सादर केला.

    शहरातील भाविक भक्तांसह संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दिंडीतील  वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर साक्षात विठ्ठल- रुक्मिणी भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.अनेकांना तर नथमस्तक होण्याचा मोह आवरता येत नव्हता.तसेच फोटो,सेल्फीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.प्रशालेच्या मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments