Breaking News

एसटी बस मध्ये चढताना महिलेच्या ४ तोळ्याच्या बांगड्या लंपास

Woman's 4 tola Gold bangles stolen while boarding ST bus

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - एस.टी. स्टॅण्ड फलटण येथे एस. टी. बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने महिलेच्या हातातील ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या (पाटल्या) चोरून नेल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनला अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी श्रीमती अंजना जयवंत बाबर वय ५७ वर्षे रा. मायणी ता. खटाव या त्यांच्या मावशी सोबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी दिनांक २० रोजी फलटण येथे नातेवाईक कुमठेकर यांच्याकडे मुक्कामी आल्या होत्या.  दिनांक २३ जून रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास श्रीमती अंजना जयवंत बाबर व त्यांची मावशी या मायणी येथे जाण्यासाठी फलटण एसटी स्टँड येथे आल्या, त्यावेळी श्रीमती बाबर यांच्या दोन्ही हातात सोन्याच्या पाटल्या होत्या.  दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बारामती सांगली या एस.टी.ने मायणी येथे जाण्यासाठी बसमध्ये चढू लागल्या.  त्यावेळी गाडीला खुप गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्याने श्रीमती बाबर यांच्या हातातील ८० हजार रुपये किंमतीच्या ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या (पाटल्या) चोरून नेल्या असल्याची फिर्याद श्रीमती अंजना बाबर यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

No comments