Breaking News

डीपी (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे १८ गुन्हे उघडकीस ; ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

18 cases of DP (Transformer) theft revealed; Goods worth Rs 8 lakh 80 thousand seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - फलटण ग्रामीण पोलिसांनी चमकदार कामगिरी करत, डीपी (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आणून, त्यामध्ये एकूण ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी  पोलिसांनी फलटण शहरातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील डी पी चोरीचे गुन्हयांनी डोके वर काढले होते. डी पी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, सातारा समिर शेख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक  बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक सनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या डी पी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन, ते उघड करण्याकरीता, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे विशेष पथक वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत डी पी चोरी अनुषंगाने आरोपींचा शोध व तांत्रीक विश्लेशन करुन आरोपी नामे १) संतोष जगन्नाथ घाडगे २) सागर युवराज घाडगे ३) किरण भिमराव घाडगे सर्व रा. मलटण ता. फलटण जि सातारा व त्यांचे इतर साथीदार यांनी डोकी चोरी केल्याची माहीती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण तपास पथकाने त्यांचा शोध घेवुन, वरील आरोपी पैकी ५) संतोष जगन्नाथ घाडगे २) सागर युवराज घाडगे ३) किरण भिमराव घाडगे सर्व रा. मलटण ता. फलटण जि सातारा यांना ताब्यात घेतले त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सुरुवातील उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्यांनी इतर साथीदारांसह फलटण तालुक्या मध्ये तसेच वाठार पोलीस ठाणे व लोणंद पोलीस ठाणे व फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमधील डी पी चोरी केले असलेचे कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांचेकडुन विवीध ठिकाणी चोरी केलेली सुमारे ३,८०,००० / किमतीचे एकूण ३८० किलो वजनाचे तांबे व चोरी करण्यास वापरलेले वाहन ओमनी असा एकुण ८,८०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींनी आणखी कोठे काही गुन्हे केले आहेत काय याचा तपास पुढे चालु आहे.

    सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल धस सो व पोलीस निरीक्षक सनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहण हांगे, पोलीस हवालदार अरुण शेंडे, महादेव पिसे, पोलीस नाईक नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तुषार आडके, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार तुषार नलवडे, हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

No comments