Breaking News

पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा उद्या मार्गदर्शन करणार - खा.सुप्रिया सुळे

83-year-old young warrior will give guidance tomorrow - MP Supriya Sule

     गंधवार्ता वृत्तसेवा दि.४ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे दुपारी १.०० वाजता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार असल्याचे खा. सुप्रियताई सुळे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. 

    ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे दुपारी १.०० वाजता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या.असे आवाहन खा.सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

 


No comments