घडशी समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु - चंद्रशेखर बावनकुळे
फलटण : राज्यातील 'घडशी' समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
'घडशी' समाजाच्या विकासासाठी शिष्टमंडळाच्यावतीने मुंबई येथे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी त्यांनी सदर ग्वाही दिली आहे.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघ अध्यक्ष अनिल पवार, सचिव शरद धुमाळ, धोंडिराम साळुंखे सदस्य, अभिजीत पवार कोषाध्यक्ष, सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पवार, जेष्ठ मार्गदर्शक नंदकुमार गायकवाड, नाना जगताप, यश जगताप, घनःशाम मोरे, माजी पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद मोरे, मुंबई घडशी समाज संघाचे संस्थापक सेक्रेटरी गुरुदास साळुंखे, भाजपाचे सचिव नवनाथ पडळकर आदींची उपस्थिती होती.
No comments