अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister, while eight others took oath as Ministers
मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
No comments