दारूच्या नशेत ११२ क्रमांकावर खोटी माहिती दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जुलै - दारूच्या नशेत ११२ क्रमांकावर संपर्क साधून, पोलीस प्रशासनास खोटी माहिती दिल्याप्रकरणी मिरेवाडी येथील दीपक हिम्मत जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस इर्मजन्सी सर्व्हिससाठी नागरिकांकरिता ११२ नंबर आहे. अडचणीच्या काळात नागरिकांनी या नंबरवर संपर्क साधल्यावर पोलिसांची तात्काळ मदत संबंधित नागरिकाला मिळते.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ जुलै २०२३ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दीपक हिम्मत जाधव रा. मिरेवाडी, इनामवस्ती ता. फलटण याने दारू पिऊन, डायल ११२ वर कॉल करून, खोटी माहिती दिली. पोलिसांनी याची सत्यता तपासली. परंतु तो दारूच्या नशेत खोटी माहिती देत असल्याचे आढळले. पोलिसांनी जाधव यास ब्रेथ ॲनालायझर मशीनमध्ये फुंकर मारण्यास सांगितले असता, जाधव याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनतर जाधव यांच्या विरुद्ध मादक द्रव्याचे सेवन करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शेंडे हे करीत आहेत.
No comments