Breaking News

फलटण तालुक्यातील कोतवाल रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत संपन्न

Completed release of reservation for Kotwal vacancies in Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यातील कोतवाल पदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत काढताना ८० टक्के भरती करण्याच्या नियमानुसार १७ पैकी १४ गावातील कोतवाल पदांसाठी आरक्षणे निश्चित करण्यात आली असून उर्वरित ३ पदे रिक्त राहणार असल्याचे प्रांताधिकारी तथा अध्यक्ष कोतवाल निवड समिती सचिन ढोले यांनी सांगितले.
      तहसीलदार तथा निवड समिती सदस्य सचिव कोतवाल निवड समिती अभिजीत जाधव यांच्या दालनात सदर आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार गुणवरे (अनुसूचित जाती महिला), साठे (अनुसूचित जाती), गोखळी (अनुसूचित जमाती), वाठार निंबाळकर (इतर मागास वर्ग महिला), होळ (इतर मागास वर्ग), राजुरी (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला), तडवळे (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक), खामगाव (सर्वसाधारण महिला), वडले (सर्वसाधारण महिला), हिंगणगाव (सर्वसाधारण), गिरवी (सर्वसाधारण), तरडगाव (सर्वसाधारण), कुसुर (सर्वसाधारण), धुळदेव (सर्वसाधारण) याप्रमाणे कोतवाल पदासाठी आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. हणमंतवाडी, आदर्की बु||, बरड या ३ गावातील कोतवाल पदे रिक्त राहणार आहेत.
         कोतवाल भरती प्रक्रियेचा कालबध्द कार्यक्रम जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्देशानुसार पार पाडणेत येणार असून त्याबाबत सर्व संबंधीतांना पूर्व कल्पना देण्यात येईल असे प्रांताधिकारी तथा निवड समिती अध्यक्ष सचिन ढोले यांनी जाहीर केले.
     यावेळी कोतवाल निवड समितीचे अन्य सदस्य, संबंधीत गावातील जिल्हा परिषद, पंचायत समिती माजी सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वगैरेंना निमंत्रित करण्यात आले होते.

No comments