Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनियुक्त मंत्र्यांसह मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना केले अभिवादन

Deputy Chief Minister Ajit Pawar saluted the portraits of the newly appointed Ministers along with the icons of the great men of the Ministry

    मुंबई, दि. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    मंत्री सर्वश्री छगन भुजबळ,  दिलीप वळसे-पाटील,  हसन मुश्रीफ,  धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील तसेच कु. आदिती तटकरे यांनीही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments