Breaking News

फलटणच्या विकासकामांवरील स्थगिती उठली ; ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर- आ. दिपकराव चव्हाण

Development works worth Rs 50 crores have been approved - MLA Deepakrao Chavan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  जुलै 2023 च्या  पुरवणी बजेटमध्ये, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ५० कोटी  रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत. तसेच  २०२२ मध्ये फलटण मधील विकासकामे मंजूर झाली होती, त्या कामांना तत्कालीन शासनाने स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवली गेली असल्याची माहिती फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी दिली.
    फलटण येथे पत्रकार परिषदेत आमदार दीपकला चव्हाण बोलत होते याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे माजी नगरसेवक अजय माळवे, दादासाहेब चोरमले, राहुल निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

    २०२३ च्या पुरवणी बजेटमध्ये शासनाकडून फलटण मतदारसंघातील ४९.९० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजूरी मिळाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते, रस्त्यावरील ब्रिजच्या कामांचा समावेश आहे. येत्या काही दिवसात त्या कामांची टेंडर निघून ती कामे सुरू होणार असल्याची माहिती आमदार दीपकराव चव्हाण यांनी दिली.

    २०२२ च्या बजेटमध्ये फलटण मतदारसंघातील जी कामे मंजूर करण्यात आली होती त्या कामांना तत्कालीन शासनाने स्थगिती दिली होती त्यामध्ये फलटणमधील २० कोटी रुपयांची कामांचा समावेश होता. यामध्ये भडकमकर नगर येथे महिलांसाठी बहुउद्देशीय हॉल बांधणे तसेच फलटणच्या वैकुंठ स्मशानभूमी येथे गॅस दहन वाहिनी बसवणे या दोन्ही कामांना स्थगिती मिळाली होती. दोन्ही कामाची स्थगिती उठवण्यात आली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून १५ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती, त्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, रविवार पेठ येथील सुपर मार्केट ची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधणे, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे ध्वनीयंत्रणा बसवणे,  मंगळवार पेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भावनाची इमारत बांधणे, दत्तनगर -शिंदे इमारत ते दगडी फुल ते हनुमान मंदिर ते वेलणकर दत्त मंदिर नाला बंदिस्त करणे, महात्मा फुले शॉपिंग सेंटर लगत असणारे खाऊ गल्ली येथे फूड मॉल विकसित करणे या सर्व कामांना तात्कालीन शासनाने स्थगित दिली होती परंतु ती स्थगिती आता उठवण्यात आले असल्याची माहिती आमदार दीपकराव चव्हाण यांनी दिली व मंजूर केलेल्या कामाबद्दल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.

        फलटण तालुक्यातील ज्या कामांची स्थगिती उठली आहे या कामांमध्ये फलटण मधील, संस्थानकालीन नाल्याच्या समावेश आहे आणि तो बंदिस्त करण्याबाबत अनेक नगरसेवक व नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. दत्तनगर ते वेलणकर दत्त मंदिर वाहणारा नाला बंदिस्त करण्याचे प्रयत्न करून मंजुरी आणण्यात आली होती, परंतु त्या कामाला स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती आता उठली आहे.  भडकमकर नगर येथे महिलांसाठी योगा क्लासेस, जिम एक्झरसाइज करता बहुउद्देशीय हॉल बांधण्याचे काम स्थगित करण्यात आले होते त्या कामाचीही स्थगिती उठवण्यात आली आहे, सांस्कृतिक भवन सध्या काम सुरू आहे, परंतु साऊंड सिस्टिम व इलेक्ट्रिक काम त्यामध्ये मंजूर करण्यात आले होते त्याचीही स्थगिती उठवण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाची जुनी इमारत, काढून तेथे अडीच कोटी रुपयांची नवीन इमारत बांधण्याची योजना होती. फलटणमध्ये खाऊगल्ली अस्ताव्यस्त स्वरूपात उभारण्यात आली आहे परंतु ती पद्धतशीरपणे विकसित करण्याची योजना होती.  फलटण शहरात सीसीटीव्ही योजना बसवण्यात येणार होती, त्याचबरोबर सुपर मार्केट चे इमारत पाडून तेथे मोठी इमारत बांधण्याची योजना होती. या सर्व विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती, ती सर्व स्थगिती उठवण्यात आली असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

No comments