Breaking News

सातारा जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थीतीशी मुकाबला करण्याकरीता प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थित रेस्क्यू टिमला आपत्कालीन साहित्यांचे वाटप

Distribution of emergency materials to the rescue team in the presence of Collector Jitendra Dudi, the administration is ready to deal with the emergency situation in Satara district.

    सातारा - जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थीतीशी मुकाबला करण्याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थीती हाताळण्याकरिता प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाच्या समन्वयातून  जिल्ह्यातील रेस्क्यू टिम सतर्क ठेवण्यात आले असल्याचे  प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष  जितेंद्र डुडी यांनी केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्ह्यातील रेस्क्यू टिम यांना आपत्कालीन साहित्यांचे वाटपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर, जिल्ह्यातील रेस्क्यू टिम सदस्य उपस्थित होते.

    यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ट्रेकर्स, महाबळेश्वर, प्रतापगड सर्च अँण्ड रेस्क्यू टिम, महाबळेश्वर, छञपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टिम, सातारा, शिरवळ रेस्क्यू टिम, सह्याद्री ट्रेकिंग अँड स्पोर्टस असोसिएशन, महाबळेश्वर, खंडाळा रेस्क्यू टिम यांना आपत्कालीन साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

No comments