Breaking News

माजी सरपंच सौ. सविता खटके यांचे निधन

Former Sarpanch Mrs. Savita Khatke passed away

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खटकेवस्ती, ता. फलटण ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. सविता बजरंग खटके  यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. 

    सौ. सविता खटके नानी या नावाने सर्व परिचित होत्या, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यात तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये तन, मन, धनाने सहभागी होणारे दानशूर व्यक्तिमत्व अशी त्यांची वेगळी ओळख होती. खटकेवस्ती येथे राज्य पातळीवरील चैतन्य श्रीराम जप संकुल भरविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प. पू. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दिंडी पंढरपूर पायी वारी सोहळ्यात त्या दरवर्षी  सहभागी होत असत.

    श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन बजरंग सुभेदार खटके यांच्या पत्नी व विक्रीकर उपायुक्त श्रीकांत खटके यांच्या मातोश्री होत्या.  

    खटकेवस्ती येथील राहत्या     घरापासून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक आणि खटकेवस्ती व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
       गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments