सोनवडी येथे महिलेवर सामूहिक बलात्कार ; ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : सोनवडी ता फलटण येथे दिनांक १९ जून रोजी रात्री कोळसा मालक व इतर चार जणांनी एका आदिवासी मजूर महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी विरुद्ध ३७६, ३७६ ड ,अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व वेठबिगार कायद्यांतर्गत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील हे मजूर फलटण येथील सोनवडी येथे मजुरीसाठी आले होते.मौजे सोनवडी बुद्रुक गावाच्या हद्दीत हसन लतीफ शेख याने फिर्यादी आदिवासी महिला हिच्या पतीला दहा हजार रुपये देऊन कामाकरिता ठेवून घेतले होते व फिर्यादीची मुले स्वतःजवळ ठेवून व फिर्यादी महिलेच्या पतीला कामाला लावून हसन लतीफ शेख व इतर अनोळखी चार इसम यांनी दिनांक १९ जून रोजी संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ते दि १९ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मौजे सोनवडी बु गावाच्या हद्दीत हसन लतीफ शेख याच्या शेतामधील खोपीमध्ये फिर्यादी आदिवासी महिलेच्या इच्छेविरुद्ध हसन रफिक शेख (रा. सोनवडी बु ता.फलटण जिल्हा सातारा) व इतर चार अनोळखी व्यक्ती यांनी वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध करून तसेच तु कोणास काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलाला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.
पीडित महिलेवर अत्याचार झाल्यानंतर हे कुटुंब पंढरपूर व त्या नंतर आपल्या रायगड जिल्यातील मूळ गावी गेले मीरा भाईंदर पोलिस स्टेशन मधून मदत मिळाल्यानंतर व आदिवासी समाजासाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीने पीडित आदिवासी महिला व त्यांच्या कुटुंबियांना फलटण ग्रामीण पोलिस ठाणे फलटण येथे आणून पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणाहून अन्य दोन मजुरांची व पिडीत महिलेची दोन लहान मुले व सासू सासरा आशा चौंघाची सुटका करून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सदर गुन्ह्यांचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस करत आहेत.
No comments