Breaking News

महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यास शासन सकारात्मक : आरोग्यमंत्री तानाजी सावंत ; त्रुटी दूर करुन सर्वसामान्यांना लाभ मिळाला पाहिजे : आ. दिपक चव्हाण

Government is positive to implement Mahatma Phule Jan Arogya Yojana effectively: Health Minister Tanaji Sawant

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील त्रुटी दूर करुन ती अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या आणि काही महत्वाचे आजार त्यामध्ये समाविष्ट करण्याच्या आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत योजनेत समाविष्ट आजारांसाठी पुरेशी तरतूद करणे, सर्पदंशासारखे आजारांचा समावेश करण्याला आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी मान्यता देत त्याबाबत सभागृहात घोषणा केली. 


        फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ. दिपक चव्हाण यांनी आज विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे
म. ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना चांगली असली तरी सदर योजनेचा लाभ घेताना सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी सभागृहात मांडून त्याबाबत शासनाची भूमिका काय असा सवाल लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत बोलत होते.
    महाराष्ट्र राज्यात म. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे, गोरगरिबांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणे अपेक्षित आहे, राज्य शासनाने योजनेतील मदतीची रक्कम दीड लाख रुपयांवरुन पाच लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे, तथापि विशेषतः ग्रामीण भागात सदर रक्कम वाढीची अंमलबजावणी होत नसल्याचे तसेच प्रारंभी या योजनेत उपचार घेण्यासाठी ९५० आजारांचा समावेश होता, १३५० पर्यंत वाढविला आहे, तथापि आजही त्यामध्ये सर्प दंशाचा समावेश करणार का ? अपेंडीक्स वर उपचार घेताना असलेली संभ्रवास्था दूर करणार का ? असा सवाल आ. चव्हाण यांनी उपस्थित केला.
     काही प्रकरणात कागदपत्रांसाठी रुग्णालये व डॉक्टरांकडून रुग्णांची पिळवणूक होत आहे, खाजगी रुग्णालये व योजनेतील रुग्णालये यांचे वापरलेल्या वैद्यकीय साधनांच्या देयकामध्ये फरक असल्याने उपचार घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, विशेषतः योग्य नियंत्रण ठेवून कोणाची अडवणूक, पिळवणूक होणार नाही यासाठी शासन स्थानिक स्तरावर लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन करणार का ?  आणि योग्य सुधारणा, विविध आजारांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद, रुग्णांची अडवणूक, पिळवणूक टाळण्यासाठी उपाय योजना आणि सर्प दंश व अपेंडीक्स सारख्या आजाराबाबत असलेली संभ्रमावस्था दूर करणार का ? असा सवाल आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केले.
       पुरेशी आर्थिक तरतूद, सर्पदंश उपचाराचा समावेश, सर्व प्रकारच्या अपेंडीक्स वर उपचार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेली नियंत्रण व सल्लागार समिती स्थापन करण्यास आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी सहमती दर्शविली आहे.

No comments