Breaking News

फलटण शहरामध्ये हनीट्रॅप करणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

Honeytrapping gang arrested by police in Phaltan city

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ जुलै - युवकाला हनीट्रॅप मध्ये अडकवून, त्याच्याकडून  ५० हजार रूपयांची खंडणी वसूल करणाऱ्या  ७ जणांच्या टोळीला फलटण शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. दरम्यान फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल शेळके यांनी जाहीर आवाहन केले आहे की, जर हनीट्रॅप प्रकारची घटना कोणा बरोबर घडली असल्यास त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल. 

    फलटण शहरात झालेल्या हनी ट्रॅप प्रकरणाबाबत, फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस ठाणे गुरजि. नं. ४३४/२०२३ भा.द.वि.स.ल ३६४ (अ),३८४,३८६,३८७,३८९,३९२, १७०, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दिनांक ०६/०७/२०२३ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी यांस यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी आपआपसात संगणमत करून महिला आरोपी क्रमांक ४ मोनिका ऊर्फ साक्षी किसन मोहीते च्या मार्फतीने फिर्यादीस भेटायचे व पाहायचे आहे असे सांगुन पाचबत्ती चौक, फलटण येथील भाडयाच्या खोलीत बोलावून, तेथे इतर आरोपीना बोलावून घेवून "तु कुठला आहेस ? आमच्या बहिनी जवळ काय करतोस? असे म्हणून मारहाण केली, तसेच आरोपी क्रमांक १ ऋषीकेश प्रल्हाद बोडरे याने जबरदस्तीने फिर्यादीचा मोबाईल हॅन्डसेट काढून घेतला. तसेच आरोपीनी फिर्यादीस जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवुन विंचूर्णी रोडलगत आय.टी.आय. कॉलेजचे जुन्या इमारती जवळ नेऊन, तेथे देखिल शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली. तसेच फिर्यादी ज्याना तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची धमकी देवून, फिर्यादीचे व्हिडीओ शूटिंग करून महिला आरोपी क्रमांक ५ हिने पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादीकडून आर.सी.बुक काढून घेतले व हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांना मित्राकडून ऑनलाईन पैसे घेण्यास सांगुन ते पैसे आरोपीनी ए.टी.एम. मधुन ५०,०००/- रुपये परस्पर काढून घेतले आहेत. म्हणून वगैरे मजकुरचे खबरी वरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.

    सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हयाचे तपासी अधिकारी  एस. व्ही. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक यांना गुन्हे तपास कामी सूचना देवून, खास विशेष पथकाची नियुक्ती केली. त्याप्रमाणे गुन्हयाचे तपासामध्ये नमुद गुन्हयातील महीला आरोपी हिचे नाव पत्ता व्यतिरीक्त अशी कोणतीही ठोस माहीती नव्हती. गुन्हयाचा तपास करत असताना पोलीस स्टाफच्या मदतीने पाचबत्ती चौक, विंचुर्णी रोड तसेच इतर संशयीत ठिकाणी आरोपी वर्णन, मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांच्या मार्फतीने आरोपी यांचा शोध घेतला असता, आरोपी क्रमांक १ ऋषीकेश प्रल्हाद बोडरे वय २३ वर्षे रा. खुंटे ता. फलटण जि.सातारा हा मिळुन आल्याने त्यांचे कडे तपास केला असता, तो सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु तपास पथकाने त्यांच्याकडे कसोशिने, चिकाटीने, कौशल्यपूर्ण तपास करुन, नमुद गुन्हयातील इतर आरोपी २. धिरज अमोल लगाडे वय १९ वर्षे ३. प्रतिक विजय भंडलकर वय १९ वर्षे दोन्ही रा. खुंटे ता. फलटण जि. सातारा ४.  मोनिका ऊर्फ साक्षी किसन मोहीते वय २३ वर्षे रा. शिंदेवाडी ता. फलटण जि.सातारा हल्ली रा. पचबत्ती चौक फलटण ५  सुहासिनी योगेश अहिवळे वय २५ वर्षे मूळ रा. मंगळवार पेठ फलटण ता. फलटण हल्ली रा. बिरदेवनगर जाधववाडी ता. फलटण जि.सातारा व इतर २ विधीसंघर्षीत बालक यांचे नाव पत्ते निश्पन्न करुन त्यांना तात्काळ ताब्यात घेवून, सदर गुन्हयातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांचा गुन्हयातील सहभाग निश्पन्न करून त्यांना नमुद गुन्हयात अटक / ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपी यांची सद्या पोलीस अभिरक्षा मंजुर असुन गुन्हयाचा तपास पो.उप.निरीक्षक सुरज शिंदे हे करत आहेत. तरी फलटण शहर पोलीस ठाणे कडुन नागरिकांना अहवान करण्यात येते की, अशा प्रकारे कोणी धमकावुन खंडणी अथवा पैसे घेतले असल्यास संबधीत पिडीत तक्रारदार यांनी कोणाच्याही दबावाला अथवा धमकीला बळी न पडता फलटण शहर पोलीस ठाणेत हजर राहून याबाबत तक्रार दयावी.

    सदरची कामगीरी मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सो, सातारा, श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिक्षक सोो, फलटण भाग फलटण, श्री. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नितीन केनेकर, पो.उप.नि.सुरज शिंदे पो.उप.नि. अमोल कदम,म.पो.उप.नि.दिपाली गायकवाड, पोहवा. २११ वाडकर, पोना ५९४ जगताप, पोना ४१ लोंढे, गपोना. १४८ वाघ, मपोना १६०९ बोबडे, पोना १८०८ तांबे, पो. कॉ. २४६६ जगदाळे, पोकों २५०१ अवघडे, पोकों १९५१ पाटोळे, पोकों २५३० गायकवाड, पोकॉ १९८१ खरात, पोको २५१५ खराडे, पो. कॉ. १९९८ नाळे, पोक १५१४ टिके, मपोको २०८३ करपे यांनी सदरची कारवाई केली आहे.

No comments