Breaking News

कै. हणमंतराव पवार यांच्या पुण्यस्मरण दीनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Kai Organization of various programs on the occasion of Hanmantrao Pawar's death anniversary

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लि. फलटण संचलित श्रीराम बझार फलटणच्या वतीने कै. हणमंतराव दि. पवार (आण्णा) यांच्या २६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि. १७ जुलै २०२३ रोजी  श्रीराम बझार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

    यामध्ये दि. १७ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता कै. हणमंतराव दि. पवार (आण्णा) यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पणकरून आदरांजली वाहण्यात येईल. व नंतर मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन होईल. त्यानंतर गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता ५ वी, इयत्ता ८ वी शिष्यवृत्तीधारक विदयार्थी, सेवकांचे गुणवंत पाल्य इयत्ता १ ली ते पदवीधर तसेच सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कुल व ज्युनि कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येईल. याप्रसंगी संस्थेच्या सेवकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शाखा उत्तेजनार्थ बक्षीस वाटप कार्यक्रम होईल.

    त्यानंतर संस्थेमार्फत दिला जाणारा आदर्श सेवक व आदर्श सेविका पुरस्कार सन २०२३ या पुरस्कारांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. यामध्ये आदर्श सेवक पुरस्काराने श्री ज्योतिराम एकनाथ शिंदे व आदर्श सेविका पुरस्काराने श्रीमती गीता विलास पवार यांना सन्मानित करण्यात येईल.

No comments