के.बी.च्या न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स' व 'नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स'चे शानदार लॉंचिंग
दोन्ही प्रोडक्ट शेतमाल उत्पादनात मोलाची ठरतील - सचिन यादव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ जुलै- भारतामध्ये सध्या ऑरगॅनिक शेती करण्याकडे आणि त्यासाठी लागणाऱ्या रसायनमुक्त प्रॉडक्ट खरेदीकडे शेतकऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शेतकऱ्यांची मागणी आणि त्याचे सद्य स्थितीचे महत्व जाणून के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. हि वनस्पतीजन्य उत्पादने निर्माण करत असणारी पहिली कंपनी असून, या कंपनीने लिक्विड फॉर्ममधील पेस्टीसाईड्स आणि पीजीआर च्या अद्भुत यशानंतर ग्रॅन्युअल्स फॉर्ममधील 'न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स' आणि 'नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स' हि उत्पादने दिनांक २६ जून २०२३ रोजी लॉंच करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पाडण्यासाठी त्यांचा समावेश केला आहे.
या उत्पादनांचे लॉंचिंग के. बी. बायोचे डायरेक्टर मा. श्री सचिन यादव सर यांच्या शुभहस्ते फलटण येथील मुख्य कार्यालयात राजस्थान येथील डिलर्सच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणामध्ये करण्यात आले.
यावेळी सचिन यादव सर म्हणाले, प्रत्येक शेतकरी रेसिड्यू फ्री शेती सोबतच आपल्या पिकाचे भरघोस उत्पादन कसे घेईल आणि प्रत्येक शेतकरी आपला शेतमाल निर्यातक्षम कसा उत्पादित करू शकेल हा उद्देश ठेवून आम्ही उत्पादनांची निर्मित करत आहोत. 'न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स' हे असे उत्पादन आहे जे जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करून जमिनीचा सामू नियंत्रित करण्याचे कार्य करते तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांचे बॉण्डिंग तोडून अन्नद्रव्ये अपटेक करून पिकाची जोमदार वाढ करून देणारे एकमेव आणि ग्रॅन्युअल फॉर्ममधील पहिले अद्वितीय प्रॉडक्ट आहे. तर 'नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स' पिकाच्या सर्वांगीण वाढ व विकासासाठी, अधिक फुलधारणेसाठी, फुलांचे रूपांतर फळांमध्ये होण्यासाठी तसेच फुल व फळांची गळ रोखण्यासाठी मार्कर कंपाउंड्सपासून निर्माण केलेले उत्पादन असून पिकाच्या आवश्यकतेनुसार व अवस्थेनुसार पोषक घटक पुरवून भरघोस उत्पादन मिळवून देणारे प्रॉडक्ट आहे. या दोन्ही उत्पादनांचा उपयोग शेतकरी बेसल डोस, टॉप ड्रेसिंग व ब्रॉडकास्टिंग मध्ये करू शकणार आहेत आणि विश्वास आहे या प्रॉडक्ट्सचा शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनात मोलाचा वाटा ठरणार आहे.
आम्ही हि उत्पादने १ किलो, ४ किलो, ८ किलो आणि २० किलो या पॅकेजिंग साईज मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजपासून हि उत्पादने जवळच्या कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असतील. सर्व शेतकऱ्यांनी या उत्पादनांचा जरूर वापर करावा व भरघोस उत्पादन घ्यावे.
विशेष बाब म्हणजे या प्रॉडक्ट लॉंचिंग कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या राजस्थान डीलर्स बांधवांनी या उत्पादनाची डेमोसह सविस्तर माहिती घेतली आणि हि उत्पादने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या उत्पादन वाढीसाठी अद्वितीय ठरतील असे मत आणि विश्वास व्यक्त केला.
No comments