युवतीचा विनयभंग ; तुझे लग्न होवू देणार नाही असे म्हणत केली दमदाटी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाविद्यालयीन युवतीस माझी तक्रार केली होतीस, मी तुला सोडणार नाही. मी जेलमधून सुटलो आहे. तुझे लग्न मी होवू देणार नाही अशी दमदाटी व शिवीगाळ करीत विनयभंग केल्याप्रकरणी मोळ ता. खटाव येथील एकावर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गणेश सुभाष घोरपडे वय २२ रा. मोळ ता. खटाव असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २ जुन ते दि. ४ जुलै या कालावधीत मुधोजी महाविद्यालय, तेली गल्ली व फलटण बसस्थानक येथे घोरपडे याने महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करुन, माझे तुझ्यावर प्रेम होते, तरीही तू माझी तक्रार केलीस, मी तुला सोडणार नाही. मी जेलमधून सुटलो आहे. तुझे लग्न मी होवू देणार नाही अशी दमदाटी व शिवीगाळ करीत तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दीपाली गायकवाड करीत आहेत.
Post Comment
No comments