Breaking News

कुरवली येथे मायलेकींचा विनयभंग ; पोक्सो व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

molestation of Mother and Daughter at Kurwali; A case has been registered under POCSO and Atrocities Act

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ जुलै -  कुरवली खुर्द ता.फलटण येथे शाळकरी मुलींच्या भांडणाच्या रागातून दलित महिला व तिच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून, विनयभंग केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात आयपीसी, पोक्सो व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरवली खुर्द, ता. फलटण गावामध्ये काल दि. २३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास  दोन शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून, पिडित दलित महिला व तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने पिडित महिलेच्या तक्रारीवरून, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. १४०९/२०२३. भा. दं. सं. कलम ३५४, ३५४(अ), ३२३. लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अ. जा. ज. (अ. प्र. ) अधिनियम १९८९ चे सुधारीत अधिनियम २०१६ चे कलम ३ (१) (आर) (एस). ३(१)(डब्ल्यू) (१) ३(२) (व्ही.ए.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सदर गुन्ह्यातील पिडित महिला व आरोपी हे दोघेही आपापल्या कुटूंबासह कुरवली खुर्द, ता. फलटण या गावामध्ये राहण्यास आहेत. दि. २३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ७.३० वा. चे सुमारास कुरवली खुर्द, ता. फलटण गावातील वृद्धाश्रमासमोर पिडित महिलेची अल्पवयीन मुलगी व आरोपीची अल्पवयीन मुलगी यांच्या मध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरुन, आरोपी व त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी दि. २३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पिडित महिला व त्यांची अल्पवयीन मुलगी यांना, हाताने मारहाण करुन पिडित महिलेचा व त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.

No comments