Breaking News

नीरा उजव्या कालव्याचे अस्तरीकरण झालेच पाहिजे - पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी

Neera right canal must be lined - demand of farmers in eastern region

    गोखळी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ जुलै - नीरा उजव्या कालव्याचे अस्तरीकरण झालेच पाहिजे अशी ठामपणे मागणी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आज केली.  फलटण-आसू रोडवरील खोमणे कॉम्प्लेक्स समोर  गोखळी पाटी येथे निरा उजवा कालव्याचे असतीकरण करावे या मागणीसाठी राजकारण विरहित सर्व  शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण करावे अशी ठाम मागणी उपस्थित शेतकऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण करण्यावरुन शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

     अस्तरीकरण करण्याच्या मागणीसाठी अजून एक दोन बैठकांचे आयोजन करण्यात येऊन फलटण पूर्व भागातील गावांमध्ये दररोज बैठका आयोजित करून, नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरणा बाबत जनजागृती करण्यात येऊन शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन देऊन नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरणामागची भूमिका मांडण्यात येईल असे बैठकीत सर्वानुमते ठरले. यावेळी  धिरेंद्रराजे   खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले, तानाजी बापू गावडे, पै बजरंग गावडे, जयकुमार शिंदे, विकास वरे, नारायण पवार, बापूराव गावडे,   विश्वास दादा गावडे, संतोष खटके, मिलिंद खटके, विलास दडस, रोहण गावडे, डॉ हणमंत गावडे, प्रदीप वरे, एम. के.कदम, अप्पासो मिंड , युवराज मिंड, ज्ञानेश्वर पवार, अधिकराव मोरे, शिवाजी शेडगे, राहुल पवार, बाळासाहेब गावडे, संतोष गावडे, रणजित घाडगे, रमेश गावडे, तुकाराम गावडे, राधेश्याम जाधव, पोलिस पाटील विकास शिंदे, मनोज तात्या गावडे,  संजय वरे, रुपेश पाटील, महेश खटके, सत्यजित खटके,   मल्हारी अवघडे, राजेंद्र गावडे,  विण्षू शिंदे, गणेश भोसले, अविनाश आटोळे, सुहास कर्णे यांसह गुणवरे,आसू, शिंदेनगर,ढवळेवाडी,पवारवाडी, साठे, गोखळी, खटकेवस्ती आदी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments