Breaking News

नेट-सेट - 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीस 30 जुलै पर्यंत मुदतवाढ

NET-SET - 2023-24 Pre-Exam Training Registration extended till 30th July

    सातारा - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून युजीसी नेट - सीएसआयआर-नेट, एमएच-सेट - 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते.

    विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योती कडून युजीसी नेट, सीएसआयआर-नेट,  एमएच-सेट 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याकरिता सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी.

No comments